Welcome to My Blog

मिरवणूक म्हटली की ‘डीजे’चे प्रस्थ... मोठमोठ्या स्पीकर्सवर लावलेली गाणी आणि त्यावर नाचणारी तरुणाई! ‘ढिंचॅक’चे आवाज आणि त्यावर चलतीतील गाणी... गणपतीत तर त्यांच्या एकसुरी आवाजाचा उच्छाद वाटू लागतो. त्यामध्ये मराठी मावळ वाद्य पुढे आणावे हा विचार घेऊन भांडुपच्या काही तरुणांनी ‘साईस्वर’ नावाचे ढोल-पथक तयार केले आहे आणि भांडुप मध्ये गणपती असो किंवा आणखी कुठला सण, ‘साईस्वर'ला मागणी जोरदार आहे. पथक प्रमुख सतीश सावंत हा स्वत: बऱ्याच वर्षापासून ढोल वाजवतो. ढोलताशाचा आवाज तरुण-तरुणींना आकर्षित करील असा असतो. सतीश तसाच त्याकडे ओढला गेला. त्यानंतर त्याने स्वत:ची व त्याच्या सहकाऱ्यांची आवड लक्षात घेऊन आणि त्यांच्या पाठिंब्यावर पथक सुरू करण्याचे ठरवले. ‘सद्गुरू साईबाबा हे आमचे सर्वांचे श्रद्धास्थान. त्यामुळे पथकाला त्यांच्या नावावरूनच नाव दिले जावे असे ‘साईस्वर’मधील सभासदांना वाटले. तेव्हा सर्वांनी मिळून ‘साईस्वर’ हे नाव पथकाला ठरवले’. ढोलताशे वाजवणे आणि तो वाजवण्यास शिकवणे हे अवघड काम. पण सतीश सावंतला त्यातील तांत्रिक गोष्टींची माहिती आहे. पण तरी सभासदांना शिकवण्यासाठी खास नवीन काही गोष्टी शिकून घेतल्या. त्यानंतर ३० ऑक्टोबर २०१६ रोजी पथकाचा श्री गणेशा झाला. ‘साईस्वर’ स्थापन होऊन एकच वर्ष झाले आहे, पण त्यांना मिळणारा प्रतिसाद मोठा आहे. गणपतीसाठी त्यांना ब-याच ठिकाणाहून विचारणा झाल्या आहेत. त्यातुन आलेले पैसे समाजकार्यासाठीच वापरण्याचे ‘साईस्वर’वाल्यांनी ठरवले आहे. कारण पथक हे पैसे मिळवण्यासाठी उभे केलेले नाही तर आपली संस्कृती जपण्यासाठी सुरू झालेली चळवळ आहे. त्यायोगे सत्कार्य व्हावे ही भावना पथकातील सभासदांची आहे. ‘साईस्वर’ पथकात एकूण शंभर जण आहेत. शाळकरी मुला-मुलींपासून ते कॉलेजला जाणारे, नोकरी करणारे, महिला अशा वेगवेगळ्या वयांचे सभासद पथकात आहेत. एक छंद म्हणून ढोल-ताशा वाजवायला म्हणून आपणहून पथकात सामील होतात. मुळात तरुण आनंद घेण्यासाठी म्हणून पथकात येतात. ‘साईस्वर’ मध्ये ढोल वाजवण्यासाठी मुलीही तितक्याच आहेत. अगदी शाळकरी मुलींपासून ते महिलांपर्यंत सगळ्याजणी हिरिरीने ढोल वाजवण्यासाठी भाग घेतात. ढोल वाजवण्यासाठी म्हणावी तशी शक्ती लागतेच. त्यात तो जडसुद्धा असतो. पण तरी मुली स्वतःहून शिकतात. ‘साईस्वर’ला त्याचा अभिमान वाटतो. शिस्त, वादनाची विशिष्ट पद्धत आणि ताल धरीत दिवसेंदिवस या ‘साईस्वर’ पथकाचे स्वरूप बदलत आहे. ढोल-ताशा ला लाभलेली परंपरा आणि त्यातून मिळणारा आनंद या सगळ्यागोष्टी लक्षात घेऊन तरुणाई कोणत्याही प्रकारच्या मानधनाची अपेक्षा न ठेवता याकडे वळली आहेत. ढोल-ताशा पथकांमुळे संस्कृतीची जोपासना करण्याचे काम तरुण वर्गाकडूनहोते आहे. आनंदोत्सव साजरा करण्याचा चांगला पर्याय ‘साईस्वर’ ढोल-ताशा पथकाने निर्माण केला आहे.

MEET THE CREW

Lorem Ipsum

Lorem Ipsum

Company Role

Lorem Ipsum

Lorem Ipsum

Company Role

Lorem Ipsum

Lorem Ipsum

Company Role

Welcome to My Blog

Here is a basic blog layout with a right sidebar